📌 स्थापनाः 05-05-1962 📞 फोन: 9876543210 📧 ईमेल: gpbopapur@gmail.com
आपत्कालीन क्रमांक: 108 | पोलीस: 100
Logo

गृप ग्रामपंचायत बोपापूर-दिघी

स्मार्ट ग्राम | अधिकृत संकेतस्थळ

सूचना फलक

ग्रामपंचायत बोपापूर-दिघी च्या सर्व महत्वाच्या सूचना येथे प्रकाशित केल्या जातात

📢 ग्रामसभा सूचना
📅 शुक्रवार, 26 मे 2026

महत्त्वपूर्ण ग्रामसभा

🕐 सकाळी 9:00 वाजता 📍 मराठी शाळा, उमरे

सर्व ग्रामस्थांना सूचित करण्यात येते की, आपल्या ग्रामपंचायतीची महत्त्वपूर्ण ग्रामसभा शुक्रवार दिनांक 26 मे 2026 रोजी सकाळी 9.00 वाजता मराठी शाळा, उमरे येथे आयोजित करण्यात आली आहे.

गावाच्या विकासासंदर्भातील विविध विषयांवर चर्चा करण्यात येणार असल्यामुळे सर्व नागरिकांनी वेळेवर उपस्थित राहून ग्रामसभेस सहकार्य करावे, ही नम्र विनंती.

🙏 आपली उपस्थिती — गावाच्या विकासासाठी महत्त्वाची! 🙏

तातडीच
📅 22 जानेवारी 2025

मुख्यमंत्री समृद्धी पंचायतराज अभियान

🕐 दिवसभर 📍 संपूर्ण गाव

सर्व ग्रामस्थांना सूचना: मुख्यमंत्री समृद्धी पंचायतराज अभियान ची संघ दिनांक 22 जानेवारी 2025 रोजी आपल्या गावात भेट देणार आहे. ही संघ आपल्या गावाची पाहणी करण्यासाठी आणि गावाच्या विकासाची स्थिती तपासण्यासाठी येणार आहे. सर्व ग्रामस्थांना या संघाशी सहकार्य करण्याची विनंती आहे. कृपया गावातील स्वच्छता, सुविधा आणि विकास कामांची माहिती संघाला देण्यासाठी तयार राहावे. आपले सहकार्य आणि सहभाग महत्वाचा आहे.